सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वांजरी गावात १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.
मृतकाचे नाव महेश रामभाऊ उज्वलकर (वय १९, रा. वांजरी) असे आहे. महेशने शेतात झाडाला दोरखंड बांधून गळफास घेतल्याचे समजताच घरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तो मृत अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून, पुढील तपास वणी पोलिस करत आहेत.