टॉप बातम्या

जनतेचा विश्वास, शिवसेनेचा खंबीर आधार पुरुषोत्तम बुटे पंचायत समिती मारेगाव निवडणुकीत प्रबळ दावेदार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या विचारधारेवर एकनिष्ठ राहून जवळपास २९ वर्षांपासून पक्षासाठी आणि जनतेसाठी झटणारे पुरुषोत्तम विठ्ठल बुटे हे मारेगाव पंचायत समिती निवडणुकीत प्रबळ दावेदार म्हणून चर्चेत आले आहेत.

सन १९९४ पासून सक्रिय राजकारणात असलेल्या बुटे यांनी प्रथम हिवरा ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून कार्य करताना गावाच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले. त्यानंतर हिवरा येथील विविध सहकारी संस्थांमध्ये कार्यकारी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावचे संचालक अशी जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. सध्या ते शिवसेना (उबाठा) मारेगाव तालुका प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

विशेष म्हणजे, त्यांनी केवळ स्वतःच्या पदासाठी नव्हे तर आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनाही तालुक्यात सन्मानाचे पद मिळवून दिले आहे. ‘पदाचा मोह नव्हे, तर जनतेची सेवा’ हे तत्व त्यांनी आजवर पाळले असून, सामाजिक प्रश्नांपासून शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्यापर्यंत प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

अनेकदा मोर्चे, जेलभरो आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी चटणी-भाकर खाऊन लढा दिला आहे. त्यामुळेच आज तालुक्यातील सर्वसामान्य जनतेत आणि शिवसैनिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी आणि आदरभाव दिसून येतो.

पंचायत समिती मारेगाव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरुषोत्तम विठ्ठल बुटे हे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असून, “जनतेचा नेता,जनतेसाठी सदैव तत्पर” असा त्यांचा ठसा उमटत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();