सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : प्रभाग 9 मध्ये रविवारी महाविकास आघाडीच्या पदयात्रेला मतदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. परिसरात उत्साह, जल्लोष आणि घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले होते. "काय ते मतदार, काय तो जल्लोष!" असे चित्र संपूर्ण पदयात्रेत पाहायला मिळाले.
अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराचा वेग लक्षणीयरीत्या वाढला असून महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले. नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्न, कागदावरील विकासकामे आणि भविष्यातील योजना यांचा प्रामुख्याने प्रचारात समावेश होता.
