टॉप बातम्या

वणी नगरपरिषद निवडणुकीत ‘लाडक्या बहिणी’ ठरणार गेमचेंजर, पुरुषांपेक्षा महिला मतदार 260 ने अधिक

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : वणी नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकारणाचे समीकरण बदलू लागले आहे. विधानसभेत महायुती सरकारला ऐतिहासिक मताधिक्य देण्यात निर्णायक भूमिका निभावणाऱ्या ‘लाडक्या बहिणी’ आगामी नगरपरिषद निवडणुकीतही गेमचेंजर ठरणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

कारण सरळ वणी शहरात या वेळी महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा तब्बल 260 ने जास्त आहे. त्यामुळे महिला मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे झुकणार, हे ठरवणारच नाही तर निवडणुकीची दिशा बदलू शकते.
महिला मतदार निर्णायक

वणी नगरपरिषदेतील एकूण मतदारसंख्या 49,456 असून त्यात महिला मतदार 24,858 आणि पुरुष 24,598 आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष व संभाव्य उमेदवारांना महिलांच्या मतांचा ठाव घेण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

महिला योजना ठरतात जमेच्या

विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्यात प्रमुखतः

• मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
• एसटी प्रवासात महिलांना अर्धे तिकीट
• ७५ वर्षावरील सर्वांसाठी मोफत प्रवास
• मुलींच्या शिक्षणाची फी माफी योजना

या उपक्रमांमुळे ‘शासन दिलेला शब्द पाळते’ असा विश्वास महिला मतदारांमध्ये निर्माण झाला असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.
बचतगटांची प्रभावी साखळी

वणी शहरात महिला बचतगटांचे प्रभावी जाळे असून, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाने कमी व्याजदरात कोट्यवधींचे कर्ज वाटप केले. बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठीही सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या.

या सर्व घटकांमुळे महिला मतदारांकडे कोणती बाजू झुकणार, हे पाहणे आता उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.

एकंदरीत, वणी नगरपरिषद निवडणुकीत ‘बहिणींचा आशीर्वाद’ ज्या पक्षाला मिळेल… त्याच्याकडे सत्तेच्या चाव्या जाण्याची अधिक शक्यता दिसते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();