टॉप बातम्या

वसंत जिनिंग अध्यक्षाविरोधात अविश्वास प्रस्ताव, 13 विरुद्ध 1 मतांनी मंजूर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वसंत जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष आशिष आनंदराव खुलसंगे यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास प्रस्ताव अखेर 13 विरुद्ध 1 मतांनी मंजूर झाला असून, हा खुलसंगे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

या संस्थेची संचालक मंडळ 17 सदस्यांची असून, त्यापैकी 14 जणांनी मतदानात सहभाग घेतला, तर 3 सदस्य गैरहजर राहिले. मतदानात खुलसंगे यांच्या वाट्याला फक्त त्यांचे स्वतःचे एक मत आले.

3 नोव्हेंबर रोजी 13 संचालकांनी खुलसंगे यांच्या विरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 73(1)(3) अन्वये आदेश जारी करण्यात आला होता.

त्या आदेशानुसार 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता वसंत जिनिंगच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली होती. याच सभेत अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले आणि तो बहुमताने मंजूर झाला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();