सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील बी. कॉम भाग दोन या वर्गातील विद्यार्थिनी कु. फाल्गुनी गणेश कामडे हिची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघात निवड झाली.
येत्या 27 ते 31आक्टोबर या कालावधीत स्वामी रामानंद तीर्थ नांदेड विद्यापीठ येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेत ती विद्यापीठाच्या संघाकडून सहभागी होणार आहे. “लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक प्रा उमेश व्यास यांचे नियमित मार्गदर्शन व परिश्रमपूर्वक सराव यांमुळे हे यश मिळाले” असे कु.फाल्गुनी कामडे म्हणाली.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयराव मुकेवार, उपाध्यक्ष नरेन्द्रजी बरडीया, सचिव सुभाषराव देशमुख आणि मंडळाच्या व्यवस्थापन समितीचे सर्व संचालक, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक प्रा. उमेश व्यास यांचेसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कु.फाल्गुनी गणेश कामडे हिचे अभिनंदन केले आहे.