सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलात भ्रष्टाचारमुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करण्याच्या उद्देशाने “दक्षता जनजागृती सप्ताह” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्यात आली असून, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
२७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत साजरा होणाऱ्या या आठवड्याचा मुख्य हेतू समाजात पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि जबाबदारीची भावना दृढ करणे हा आहे. यावेळी सर्वांनी भ्रष्टाचाराला नकार देऊन पारदर्शक कारभारासाठी शपथ घेतली. प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे, असे आवाहनही पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
या अभियानाद्वारे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने समाजात जागृती निर्माण करण्याचा आणि भ्रष्टाचारमुक्त भारताच्या निर्मितीस हातभार लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजवण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रामाणिकतेच्या मूल्यांना बळ देण्याचा संदेश देण्यात आला.