टॉप बातम्या

जिल्हा परिषद गणातील आरक्षण बदलासाठी तहसीलदारांना निवेदन सादर करणार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

झरी-जामणी : झरी-जामणी तहसील अंतर्गत जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण “महिला” ऐवजी “सर्वसाधारण (स्त्री-पुरुष)” करण्याबाबत तहसीलदार व तहसील निवडणूक अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सन २०१७ च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संबंधित गणाचे आरक्षण “सर्वसाधारण (महिला)” असे होते. यावेळी पुन्हा त्याच प्रकारचे आरक्षण ठेवणे अन्यायकारक ठरून रोटेशन तत्त्वाच्या विरोधात आहे.

निवेदनात असेही म्हटले आहे की, प्रत्येक निवडणुकीनंतर आरक्षणात बदल होणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्वाची समान संधी मिळेल. त्यामुळे यंदा जिल्हा परिषद गणाचे आरक्षण “अनुसूचित जमाती (सर्वसाधारण स्त्री-पुरुष)” असे घोषित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे.

सन २०१७ मधील आरक्षण तपशीलानुसार —

माथार्जुन–मार्की गण : सर्वसाधारण (महिला)

मुकुटबन–पाटण गण : सर्वसाधारण (महिला)


यावेळी या दोन्ही गणांना “अनुसूचित जमाती (सर्वसाधारण स्त्री-पुरुष)” असा प्रवर्ग देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

तसेच, पाटण, मुकुटबन, माथार्जुन आणि मार्की (कोसारा) पंचायत समिती सर्कलचे २०१७ मधील आरक्षण तपशील सादर करून, समान संधी व न्याय्य प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी रोटेशननुसार बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये बाबुलाल झित्रू किनाके, रमेश दौलतराव आत्राम, अरुण पैकुजी येडमे, योगेश कारु मडावी, माधव जलपत आत्राम, विनोद हरिदास पिंपडकर आणि नानूभाऊ उद्धवराव कोडपे यांचा समावेश आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();