सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री सुनंदा मधुकरराव उंबरकर (वय ८५) यांचे गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने उंबरकर परिवारासह वणी शहरात शोककळा पसरली आहे.
स्व. सुनंदा उंबरकर या राजू उंबरकर यांच्या आयुष्याचा प्रेरणास्त्रोत आणि मार्गदर्शक होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व साधेपणा, आपुलकी आणि समाजभावनेने परिपूर्ण होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच वणीतील राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा बराच आपुलकीचा परिवार असून, त्यांच्या स्मृतींनी वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.