टॉप बातम्या

शिंदे गटात नवे चेहरे; वणी विधानसभेच्या राजकारणात उलथापालथीची चाहूल

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे

वणी : शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रशिक्षण शिबिराने आज जिल्ह्याच्या राजकारणात नवा भूचाल घडवला. काँग्रेस, भाजप आणि इतर पक्षातील अनेक प्रभावी कार्यकर्त्यांनी एकाच मंचावर शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे पूर्णतः बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पालकमंत्री संजय राठोड आणि माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर युवा कार्यकर्त्ते शिवसेनेत सामील झाले.

या प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे युवा कार्यकर्ते निलेश परगंटीवार, माजी नगराध्यक्ष अरुण पटेल तसेच हिंदुत्ववादी युवा नेतृत्व कार्तिक देवडे यांनी शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. परगंटीवार हे सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात. दुसरीकडे अरुण पटेल आणि कार्तिक देवडे यांसारख्या स्थानिक प्रभावशाली व्यक्तींच्या सहभागामुळे पक्ष संघटनेत नवसंजीवनी निर्माण झाल्याचे दिसत आहे.

या कार्यक्रमास मंत्री गुलाबराव पाटील, प्रतापराव जाधव, पराग पिंगळे, विजय चोरडिया यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. अलीकडेच भाजपचे विजय चोरडिया यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता, आणि आता काँग्रेसमधील नवे चेहरे सामील झाल्याने शिंदे गटाचे बळ आणखी वाढले आहे. सध्या “शिंदे गटात इनकमिंगचा हंगाम” सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात असून, माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वाखाली वणी विधानसभा क्षेत्रातील राजकीय रणधुमाळीला आता सुरुवात अगदी जोमाने झाल्याचे स्पष्ट होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();