टॉप बातम्या

दुचाकी अपघातात सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : वणी–मारेगाव रोडवरील राष्ट्रीयकृत बँकेसमोर झालेल्या दुचाकी अपघातात सेवानिवृत्त शिक्षक मुकुंदराव पत्रुजी राजूरकर (वय 61) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) दुपारी दोनच्या सुमारास राजूरकर हे बँकेतून घरी जात असताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. वणी येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

राजूरकर हे दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळेतून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();