टॉप बातम्या

नियमित वाचनाने व्यक्तिमत्त्वाची स्वतंत्र ओळख निर्माण होते — ठाणेदार गोपाल उंबरकर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : वाचनामुळे मन आणि मस्तिष्क सुदृढ होतं. त्यामुळे चांगलं-वाईट यातील फरक ओळखून योग्य निर्णय घेता येतो, जे जीवनात अत्यंत आवश्यक आहे. नियमित वाचनाने व्यक्तीची स्वतंत्र ओळख निर्माण होते, असे प्रतिपादन वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांनी केले. ते नगर वाचनालयात आयोजित दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका संघचालक हरिहर भागवत होते. दरवर्षीप्रमाणे नगर वाचनालयात महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यिक, विनोदी, स्त्रीशक्ती विषयक विविध दिवाळी अंकांची खरेदी करून वाचकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. वणीतील नागरिकांना या अंकांचे अवलोकन करता यावे, यासाठी वाचनालयात दोन दिवसांचे दिवाळी अंक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. उद्घाटनानंतर उपस्थित अतिथींनी विविध अंकांचे अवलोकन करून समाधान व्यक्त केले.

प्रदर्शनानंतर 26 ऑक्टोबरपासून 300 रुपयांचे ना-परतावा नोंदणी शुल्क भरून वाचकांना 35 दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध होणार आहेत. अध्यक्षीय भाषणात भागवत यांनी नगर वाचनालयाच्या वाचनसंस्कृती वाढविण्याच्या प्रयत्नांचा गौरव केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे सचिव गजानन कासावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष विशाल झाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी देवेंद्र भाजीपाले, प्रमोद लोणारे आणि राम मेंगावार यांनी परिश्रम घेतले.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();