सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत सालेभट्टी येथील प्रशांत शंकर नांदे (वय 46) यांचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.
मारेगावहून गावाकडे जात असताना मांगरूळ-सालेभट्टी वळण रस्त्यावर त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते रोडच्या कडेला पडले. गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रशांत हे शेती व्यवसायासोबत स्वतःची क्रूझर गाडी चालवत कुटुंबाचा गाडा हाकत होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंब, नातेवाईक आणि सालेभट्टी गावात हळहळ व्यक्त होत आहे.