टॉप बातम्या

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीचा निषेध; मारेगाव तहसील कार्यालयावर मोर्चा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगावदेशाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान करण्यात आलेल्या घृणास्पद हल्ल्याच्या घटनेचा वंचित बहुजन आघाडी, तालुका मारेगावच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या घटनेला भारतीय संविधान व न्यायव्यवस्थेवर थेट हल्ला मानून, आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. बाबासाहेबांना अभिवादन करून हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. ‘भारतीय संविधान जिंदाबाद’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

निवेदनात नमूद करण्यात आले की, सरन्यायाधीशांवर हल्ला हा एका व्यक्तीवर नव्हे, तर भारतीय लोकशाही संस्थांवर केलेला अपमान आहे. आरोपी वकील राकेश किशोर याच्यावर केवळ निलंबन न करता कठोर कायदेशीर कारवाई करावी, न्यायव्यवस्थेचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. तसेच न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहनही निवेदनात करण्यात आले.
मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर मारेगावचे तहसीलदार साहेब यांनी प्रतिनिधींचे निवेदन स्वीकारले. तसेच आमदार संजय देरकर यांनाही हे निवेदन सादर करण्यात आले. या वेळी ज्ञानेश्वर मुन, अनिल खैरे, अभिषा निमसटकर, रवी तेलंग, रेखाताई काटकर, विप्लव ताकसांडे, संजय जिवणे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();