टॉप बातम्या

धोबी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकतेची नवी झळाळी — जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

चंद्रपूर : सन्माननीय डी.डी. सोनटक्के प्रदेशाध्यक्ष तथा अध्यक्ष आरक्षण समन्वय समिती महाराष्ट्र, मा. बालाजीराव शिंदे प्रणित महाराष्ट्र राज्य परीट (धोबी) सेवा मंडळ,तथा सन्मा. अनिल शिंदे प्रणित नॅशनल धोबी महासंघ (भारत),चंद्रपूर धोबी परीट वरठी सेवा मंडळ चंद्रपूर, डेबूजी युथ ब्रिगेड चंद्रपूर या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व धोबी समाजाच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय व सुसंवाद साधत महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण धोबी समाजाला तत्काळ एस सी संवर्गाचे आरक्षण मिळावे आणि समाजाच्या आर्थिक सामाजिक व शैक्षणिक उन्नतीसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव आर्थिक तरतूद करावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेमार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. 

धोबी समाजाच्या सर्वच विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी हे समाजास न्याय मिळावे म्हणून प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. त्यामुळे आता इथून पुढे समाजाच्या कोणत्याही प्रश्नासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच संघटनांचे पदाधिकारी हे एकमेकांशी समन्वय ठेवून एक दिलाने काम करतील, असा निर्धार उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केला. 

यावेळी सर्व भाषिक धोबी परीट वरठी महासंघाचे सर्वश्री वासुदेवराव बेसूरवार विदर्भ सचिव, किशोर केळझरकर जिल्हा कार्याध्यक्ष, विजय राऊत जिल्हा उपाध्यक्ष, मनोहरराव चिंचोलकर जिल्हा महासचिव, पन्नालाल चौधरी जिल्हा उपाध्यक्ष, विजय तुरानकर जिल्हा उपाध्यक्ष, सतीश बैसवारे चंद्रपूर शहर अध्यक्ष, शुभम चिंचोलकर जिल्हा युवा कार्याध्यक्ष, श्री शशांक फाले,सौ. सपना ताजने जिल्हा महिला कार्याध्यक्षा, सौ. शिल्पा ताई भोस्कर जेष्ठ मार्गदर्शिका व समाज सेविका, सौ सुरेखा मुके चंद्रपूर परीट धोबी सेवा मंडळाचे सर्व श्री. प्रमोद केळझरकर माजी जिल्हाध्यक्ष, बंडूजी दुरूतकर माजी जिल्हा सचिव तथा कार्याध्यक्ष, रत्नाकर नल्लूरवार माजी प्रसिद्धी प्रमुख, हरीष थेटे, मिलिंद लोणारवार, मोहन गड्डमवार,यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();