टॉप बातम्या

आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची जामिनावर सुटका; वणीत जल्लोषात स्वागत

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद करून त्यांना अटक करण्यात आली होती. या सर्व 12 शिवसैनिकांची आज (दि. १० ऑक्टोबर) जामिनावर सुटका झाल्यानंतर वणीत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले.

घटनेची पार्श्वभूमी अशी की, वणी येथे मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या शासकीय दौऱ्यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि कर्जमाफीसाठी जोरदार घोषणा देत काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्यांनी सोयाबीन व कपाशीची झाडे हातात घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

या आंदोलनादरम्यान पोलिसांनी 12 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. मात्र, आता जामिनावर सुटका झाल्यानंतर वणी शहरात या शिवसैनिकांचे आमदार संजय देरकर यांच्या उपस्थितीत उत्साहात स्वागत करण्यात आले. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी स्थानिक शिवसैनिक आणि जनतेचा मोठा पाठिंबा दिसून आला.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();