सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मुकुटबन येथील आरसीसीपीएल (MP Birla) सिमेंट कंपनी परिसरात आयटक संलग्न जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. कंपनीतील कामगारांना योग्य वेतन मिळावे आणि प्रलंबित समस्यांचे निराकरण व्हावे, या मागण्यांसाठी काही दिवसांपूर्वी वणी विधानसभा क्षेत्राचे लढाऊ नेते काॅ. अनिल हेपट यांच्या नेतृत्वाखाली सभा घेऊन युनियनची स्थापना करण्यात आली होती.
युनियन स्थापनेनंतर कामगारांमध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कंपनी परिसरात नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी काॅ. अनिल हेपट होते. प्रमुख अतिथी म्हणून भाकप जिल्हासचिव काॅ. अनिल घाटे, तालुका सचिव काॅ. मोरेश्वर कुंटलवार, सहसचिव पांढुरंग ठावरी, कोषाध्यक्ष दिनेश शिटलवार, तसेच सुधाकर कोंकमवार, गजानन पैसठवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन काॅ. अनिल हेपट यांच्या हस्ते करण्यात आले. नामफलकाचे उद्घाटन होताच कार्यकर्त्यांनी लाल गुलाल उधळत ‘लाल झेंडा जिंदाबाद’ च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
कार्यक्रमाचे संचालन अक्षय पुल्लीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश शिटलवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंढरी नांदेकर, राजु वर्हाटे, प्रफुल बंद्रे, रोशन चामाटे, अक्षय पुल्लीवार, मोरेश्वर कुंटलवार, दिनेश शिटलवार, तसेच निरज खैरकर, सुमित नगराळे, महादेव मेश्राम, अनिल मोंडे, प्रभुदास चाफले, कलीम खान पठाण, देवराव आत्राम, राकेश काकरवार, भुमन्ना आरमुरवार, राहुल येनगुर्तिवार, आकाश पारातळे, कवडु केळझरकर, सौरभ भांदेकर आदींनी अथक परिश्रम घेतले.
या उद्घाटन सोहळ्याला शेकडो कामगार उपस्थित राहून युनियनबद्दलचा विश्वास आणि एकजुटीचा संदेश दिला.