टॉप बातम्या

वर्धा नदीकाठी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; वणी पोलिसांचा तपास सुरू

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीवणी शहरातील वेदा बारच्या बाजूला, वर्धा नदी पात्रालगत झोला शिवार परिसरात अंदाजे ४५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वणी पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

फिर्यादी संदिप पुरुषोत्तम पोले (वय ६५, रा. राळेगाव, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता, संबंधित व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात मर्ग क्र. ०७२/२५ अंतर्गत नोंद घेण्यात आली असून तपास स.पो.नि. निलेश अपसुंदे हे करीत आहेत.

मृत व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे — वय अंदाजे ४५ वर्षे, अंगात निळ्या रंगाचा पांढरे ठिपके असलेला शर्ट, लाल बनियान, व फिकट निळसर रंगाची अंडरवेअर परिधान केलेली आहे. या अनोळखी मृतकाबाबत कोणाला माहिती असल्यास वणी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. 

संपर्क क्रमांक — पो.नि. गोपाल उंबरकर : ८७८८५७७८४०, स.पो.नि. निलेश अपसुंदे : ९९२२५६०६०१, पो.कॉं. महेश बाडलवार : ९०११३२४०७८.



Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();