टॉप बातम्या

श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती मंदिरात चोरडीया परिवारातर्फे अन्नदान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : रांजणगाव गणपती (ता. शिरूर जि. पुणे) येथे भाद्रपद गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. रांजणगावमध्ये लाखों भाविक महागणपतीच्या दर्शनासाठी येतात. येथे येणाऱ्या गणेश भक्तांसाठी ठरलेल्या वेळात महाप्रसादाचे आयोजन असते. 

येथील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टला दानदात्यांकडुन अखंडित अन्नदान सेवा सुरू आहे. वणी येथील दानशूर व्यक्तीमत्व विजयबाबु चोरडीया यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही अन्नदान करण्यात आले. दिनांक ३० ऑगस्ट ला ॲड. कुणाल विजयबाबु चोरडीया यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आले. यावेळी महाप्रसादाचा असंख्य भक्तांनी लाभ घेतला.

विशेष म्हणजे गणेशोत्सवादरम्यान श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टमध्ये महाप्रसादाची अखंड १७ वर्षांपासून ही परंपरा वडील विजय बाबू आणि त्यांचा मुलगा ॲड.कुणाल चोरडिया हे दोघेही दरवर्षी पुढे चालवत आहेत.

कु. काजोल विजय चोरडिया, सौरभ राजुरकर, प्रतिक मेहता, पार्थ त्रिवेदी, ॲड. रुषभ शर्मा, तृन्मयी खाडे, कुणाल सुत्रावे, प्रमोद उरकुडे, संगीता संचोती, हर्शला बिंदेल, शिवम बिंदेल, कौस्तुभ देशपांडे, वेदिका बिंदेल आदींनी सहकार्य केले.
Previous Post Next Post