टॉप बातम्या

वणीत चौकाचौकामध्ये गतीरोधक बसविण्याची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीशहरातील मुख्य रस्त्यावर वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी चौकाचौकात गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वात वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी याना निवेदनाद्वारे केली आहे. 

वणी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते त्यातच काही दुचाकीस्वार व ऑटो चालक आपले वाहन सुसाट वेगाने हाकलत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख परशुराम पोटे, सौ.सुमित्राताई नारायण गोडे, यवतमाळ जिल्हा महिला संपर्कप्रमुख, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा सुरेंद्र निब्रड, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, वणी शहर महिला अध्यक्ष सौ प्रेमीला मनोज चौधरी, सुरेश बन्सोड प्रदेश कार्यकारिणी सदस्य, संजय चिंचोळकर, संदिप बेसरकर, राकेश दिकुंडवार इत्यादी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();