टॉप बातम्या

ईद उत्सवाला मद्य दुकानें बंद ठेवण्याची AIMIM ची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : शहरात उद्या 5 सप्टेंबर रोजी 'जश्ने ईद मिलाद उन नबी' उत्सव मोठया उत्सहात साजरा होणार आहे. या अनुषंगाने मद्याची दुकाने बंद ठेवावीत, अशी AIMIM शहर कमेटी च्या वतीने मागणी करण्यात आली आहे, याबाबत उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. 

उद्या 5 सप्टेंबरला शांती दूत इस्लाम धर्माचे धर्मगुरू पैगंबर हजरत मुहम्मद (स. अ. व ) यांचा जन्मदिन उत्सव साजरा होत आहे. या उत्सवाच्या निमित्ताने वणी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या देशी व विदेशी दारूची दुकाने तसेच बिअर बार बंद ठेवावीत, यामुळे वणी शहरात सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यास मदत होईल. अशी इंडिया मजलीस -ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) शहर कमेटी तर्फे मागणी करण्यात आली आहे.

निवेदन देताना एआयएमआयएम वणी शहराध्यक्ष असीम हुसेन, साकिब अहमद खान, तौसीफ खान, सरफराज शेख, रेहान शेख, मो. वाईस मो. सोहेल, शाकीर खान, रिझवान शेख, अरबाज शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous Post Next Post