सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरात सन २०२२ पासून वारंवार चोरी करणारा अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे, वय ३१ वर्ष, रा. रामनगर चिखलगाव वणी यास वारंवार चोरीच्या घटनेत अटक करण्यात आल्या नंतर तो जामीनावर सूटल्यावर परत परत चोरी करीत असल्याने, त्याचे वर वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली, तसेच मागील वर्षी त्यास मा. उपविभागीय अधिकारी वणी यांच्या आदेशाने तडीपारसूध्दा करण्यात आले होते. मात्र,तडीपार आदेश संपल्यानंतर अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे याने वणी शहरात परत आल्यानंतर चोरी तसेच अवैध शस्त्रे बाळगून वणी शहरात दशहत निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामूळे वणी पोलीस स्टेशनद्वारे अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे यास मा. जिल्हादंडाधिकारी साहेब यवतमाळ यांचे कडे त्यास M.P.D.A. कायद्या अंर्तगत स्थानबध्द करणे बाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी यवतमाळ यांचे आदेशाने दिनांक ०४/०९/२०२५ रोजी अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे, वय ३१ वर्ष, रा. रामनगर चिखलगाव वणी यास स्थानबध्द करणेबाबत आदेश प्राप्त झाला असून, त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह नागपूर, जिल्हा नागपूर येथे दाखल करण्या बाबत आदेश प्राप्त झाला आहे. त्याप्रमाणे अमोल उर्फ भूऱ्या विजय ठाकरे यास ताब्यात घेण्यात आले असून, जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाने त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृह नागपूर, जिल्हा नागपूर येथे दाखल करण्याची प्रकीया सूरू आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरेश दळवे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर आणि डी.बी पथकातील पो.उप.नि. धिरज गुल्हाने, मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पूप्पलवार, गजानन कुडमेथे सर्व पो.स्टे. वणी यांनी पार पाडली.