Top News

वणीत 'आप'ची बैठक, विविध पदावर शिक्कामोर्तब!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : दि.३०/०७ /२०२५ रोज बुधवार ला वणी येथील श्री रंगनाथ स्वामी देवस्थान जत्रा रोड येथे आप (aap) आम आदमी पार्टी संघटनेची सभा घेण्यात आली. या सभेत प्रामुख्याने आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष्य वसंतराव ढोके, डॉ पवार, (जिल्हा प्रचार प्रमुख) नारायणराव गोडे तथा दादाजी पोटे (वणी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष), शेख जलील शेख फरीद (शहर अध्यक्ष, वणी) यांचे उपस्थितीत पार पडली.

या बैठकीला जिल्हा प्रचार प्रमुख नारायणराव गोडे यांनी येणाऱ्या ग्राम पंचायत,पंचायत समिती, नगरपालिका निवडणूक आप (aap) तर्फे लढविण्याचे आव्हान केले आहे.

या सभेअंती सर्वानुमते नारायणराव गोडे (aap,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख), तथा विनोद खंडारे यांची aap तालुका अध्यक्ष पदी व प्रेम एडलावार यांची (तालुका प्रसिद्धी प्रमुख (MEDIA तथा SOCIAL MEDIA) करिता निवड करण्यात आली, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशांत एकरे, अक्षय मोहितकर, गोपाल पोटे यांनी अथक परिश्रम घेतले .
Previous Post Next Post