Top News

वणी - मुकुटबन मार्गावर सिमेंटचा ट्रक पलटी, वाहतूक ठप्प....

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : कायर मुकुटबन या मार्गावरील सैदाबाद जवळ एक ट्रक पलटी झाला असून वाहतूक मोठी विस्कळीत झाली. या दरम्यान वाहणांच्या रांगाचरांगा वाढल्याचे चित्र पहावयास मिळतेय.

तालुक्यातील कायर जवळील सैदाबाद फाट्या नजीक आज, शनिवारी सकाळ सुमारास एक सिमेंटचा ट्रक (क्र. आर. जे. 57 जी ए. 0195) हा भर रस्त्यात उलटला. यामुळे मुकुटबनहुन वणीकडे व वणीमार्गे कायर कडे जाणारी सर्व वाहतुक कोलमडली आहे. हा अपघात कशाने झाला याबाबत अद्याप स्पष्टता समोर आली नाही,परंतु चक्क रोडवर ट्रक पलटी झाला असून हा अपघात रोडवर झाल्याने घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. यामुळे सुमारे एक दोन तासाहून अधिक काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली झाली असून वृत्त लिहेपर्यंत पोलिस घटनास्थळी दाखल व्हायचे होती. 

सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, या अपघातात ट्रकचे दर्शनीभागाचे मोठे नुकसान पोहोचले आहे.
Previous Post Next Post