सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
आपले महाराष्ट्र पोलिस दल समाजाच्या सेवेसाठी व रक्षणासाठी सदैव सुसज्ज असते. त्यांच्यामुळेच आपण सर्वजण सुरक्षित व निर्धास्त असतो. पोलिस जवानांप्रतीची कृतज्ञता म्हणून विद्यार्थ्यांनी पोलिसांना राखी बांधून आपल्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या. यावेळी मुख्याध्यापिका पूजा जोबनपुत्रा, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी मुख्याध्यापिका जोबनपुत्रा यांनी पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना राखी भेट दिली. तर पोलीस स्टेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले.
वणी : ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल प्री स्कुल येथील विद्यार्थ्यांनी वणी पोलिस ठाण्यातील पोलिसांना राखी बांधून आगळीवेगळे रक्षाबंधन साजरा केला. गतवर्षी देखील या शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलीस बांधवाना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला होता. या वर्षीही इयत्ता दुसरी (KG2) च्या वर्गातील चिमुकल्यांनी राखी पोलिस बांधवाना बांधली.