सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : भारत सरकार वस्त्र उद्योग मंत्रालय विकास आयुक्त (हस्तकला) नागपूर व शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी यांच्या माध्यमातून दिनांक १८/०८/२०२५ ते २०/०८/२०२५ या कालावधीत राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी येथे तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा समारोप कार्यक्रम वणी पब्लिक स्कूल वणी येथील सभागृहात आयोजित करण्यात आला या समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री संजय रामचंद्र खाडे अध्यक्ष शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी होते.प्रमुख अतिथी माननीय श्री. अभय पारखी मुख्याध्यापक राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी माननीय राकेश देशपांडे प्रिन्सिपल वणी पब्लिक स्कूल वणी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संपन्न झाला.
माननीय संजय खाडे अध्यक्ष शिवकृपा बहूद्देशीय संस्था उकणी यांनी व प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांची तीन दिवसीय कार्यशाळेत तयार केलेल्या वस्तू व प्रदर्शनी यांची पाहणी व निरीक्षण केले निरीक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व माननीय संजय खाडे अध्यक्षीय मार्गदर्शनात संस्थेच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यात चालू असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कला वस्तूंच्या भुजा काटेने प्रशंसा केली व भविष्यात विद्यार्थ्याने या क्षेत्रात कार्य करून आपले नाव कमवावे तसेच सध्याच्या परिस्थितीत हस्तकला क्षेत्रात कार्य करण्याची गरज आहे व आपली प्राचीन संस्कृती उजेडा देऊन आपले नाव व आपल्या देशाची देशाची नावे करणे पुढे नेण्यास येईल याकडे प्रमुख्याने लक्ष करणे देण्याची गरज आहे व आपल्या देशाचे नाव उच्च लोक करणे आहे या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर श्री अभय पारखी सर व राकेश देशपांडे सर यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचे तयार केलेल्या कला वस्तूंचा प्रशांत केली व भावी आयुष्यात वाटचाल करण्या स शुभेच्छा दिल्या.
या तीन दिवसीय कार्यशाळे त प्रशिक्षण म्हणून श्री आशिष पाटील श्री गणू रावत श्री अनिल वाघमारे श्री प्रमोद देशमुख यांनी आपली प्रशिक्षण जाणून युक्ती निभावली.या कार्यक्रमानदरम्यान आपले मनोगत व्यक्त केले.या आभार प्रदर्शने कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री बोडखे सर सहाय्यक शिक्षक राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय वणी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गजानन अलोने CEO शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेचे कर्मचारी श्री संजय शेंडे व श्री विनीत तोडकर संस्थेची शाळेच्या शिक्षकांचा मुलांचा सहभाग होता त्याच 100 च्या वरती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.