सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील मानकी येथे विद्युत पोल झूकून ये-जा करणाऱ्यांना अडसर ठरताहेत. तो कोसळू नये म्हणून लाकडाचा आधार दिला आहे. वीज कंपनीच्या दुर्लक्षामुळे हा धोकादायक ठरत आहे. गेल्या जून महिन्यापासून वीज खांब लाकडाच्या टेका वर आहे. अशा पद्धतीने इलेट्रिक पोल वाकून राहिल्यास त्यापासून मनुष्यहानी होण्याचाही धोका आहे. वीज कंपनीने नुकसान होऊ नये म्हणून याकडे संबंधित कंपनीने दुर्लक्ष न करता तत्काळ दुरुस्त करावी, अशी मागणी जोर धरत आहे.