सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील रस्त्याची दयनीय अवस्था आहे हे वास्तव आहे. या रस्त्याची कामे व्हावी यासाठी व मारेगाव ते मार्डी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज सकाळपासून अर्धनग्न व रस्ता रोको आंदोलन सुरु केले होते. जोपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी येत नाही व रस्ता दुरुस्ती करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला होता. या दरम्यान या मार्गांवरील काही काळ ट्रॅफिक ठप्प झाली होती. जनतेनी आंदोलनस्थळी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. उप अभियंता सुहास ओचावार (PWD) यांनी आंदोलनाची दखल घेऊन लेखी आश्वासन दिले व मुरूम टाकण्यास सुरुवात केली. त्या अगोदर आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती, रस्ता मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार अशा प्रश्न उपस्थित केला.पावसाळा अखेरीस कामाला सुरुवात होईल अशी ग्वाही यावेळी दिली. तालुका अध्यक्ष मारोती गौरकार यांच्या नेतृत्वात अंकुश माफूर, आकाश बदकी यांच्या सहकार्याने आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकारी महिला पदाधिकारी, असंख्य कार्यकर्ते, परिसरातील नागरिक व पोलीस प्रशासन, महसूल विभाग ह्यांच्या उपस्थितीत आंदोलन मागे घेण्यात आले.