सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहरात सामाजिक बांधिलकीतून विशेष उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या हस्ते रस्त्यावर व्यवसाय करणारे नागरिक, महिला शेतकरी, विद्यार्थी आणि छोटे दुकानदार यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्यात उघड्यावर काम करणाऱ्या नागरिकांसाठी छत्री ही उपयुक्त सुविधा आहे, हे लक्षात घेऊन हा उपक्रम आखण्यात आला.
अनेक महिला शेतकरी, फेरीवाले, विद्यार्थ्यांना व हातगाड्यावर फळे-भाजी विकणाऱ्यांना पावसात भिजावं लागत. त्यांच्या दैनंदिन कामात थोडीशी मदत व्हावी, यासाठी शिवसेनेच्या वतीने हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे आमदार संजय देरकर व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले. सहभागी नागरिकांनी समाधान व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले.
शिवसेना ही जनतेशी जोडलेली संघटना असून, समाजोपयोगी उपक्रम ही आमची ओळख आहे. असे उपक्रम भविष्यातही राबवले जातील, असे आश्वासन अजिंक्य शेंडे यांनी यावेळी दिले. व यावेळी कुंदन पेंदोर, मनोज वाकटी, विनोद दुमने, राजु पाटील, राजू गोलाईत, संजोग झाडे, राजु मेश्राम, निलेश सूर्तीकर, संघर्ष शेंडे, कुणाल खामणकर, गौरव पांडे, निखिल मडावी, मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.