सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील साई मित्र परिवार तर्फे सतत गेल्या पंधरा वर्षापासून रक्तदान शिबीर हा सामाजिक उपक्रम अखंड राबविण्यात घेण्यात येत असुन अनेक गरजुवंत रुग्णांना आतापर्यंत त्यांनी जिवनदान दिले आहे. तेच सामाजिक कार्य अविरत सुरू असून यावर्षी सुद्धा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज मारेगाव येथील जगन्नाथ महाराज, मंदिर राष्ट्रीय विद्यालयात दि. 9 जुलै, रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. यासाठी वसंतराव नाईक शासकीय रक्त पेठी, यवतमाळ यांचे सौजन्य लाभले आहे. तसेच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर महाप्रसाद व भव्य शोभायात्राचे आयोजन केले आहे. उद्या 10 जुलै 2025 रोज गुरुवारला दुपारी 3 ते 5 पर्यंत असुन शोभायातत्रेला सायंकाळी 5 वाजता पासून सुरुवात केली जाणार आहे.
या आज होणाऱ्या रक्तदान शिबिरात व उद्याची भव्य शोभा यात्रा त्याच सोबत महाप्रसादाचे आयोजन असून याचा लाभ घ्यावा, असे साईमित्र परिवार मारेगांव तर्फे आवाहन केले आहे.