सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील बांधकाम क्षेत्रातील सुप्रसिद्ध, बिल्डर आणि डेव्हलपर्स,असलेले किरण दिकुंडवार यांचे वडील श्री. गोपाळराव श्रीहरीपंत दिकुंडवार यांचे आज राहते घरी पहाटे 4 वा. दुखद निधन झाले, त्यांच्या दुःखद निधनावर शहरातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना आपल्या शोक संदेशात म्हटलं. श्री.गोपाळराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, असा आप्त परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज मोक्षधाम वणी येथे होणार आहे. सह्याद्री चौफेर परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..