सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीला आधी लग्नाचे आमिष दाखवले. महामार्गांवरील निलगिरी गार्डन मध्ये तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले. लग्न करण्याच्या बहाण्याने गोड गोड बोलायचं आणि तिच्याकडून वाटेल तेव्हा शारीरिक भूक भागवून घेण्याचं कार्यक्रम त्याचा सुरु होताच. दि. 25 जुलै 2025 रोजी रात्री बारा वा. तो घरी आल्याने त्याच्या अशा डबल गेम वागणुकने तिला समोरचे भविष्य लक्षात येताच तिने, पोलिसात धाव घेऊन त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली.
फिर्यादीच्या जबानी वरून आरोपी मोहम्मद हकीमोद्दीन पठाण (30) रा. मेघदूत कॉलनी, वणी याचेवर कलम 69 BNS नुसार गुन्हा नोंद करून सदर प्रकरण तपासात घेतले. पुढील तपास वणी पोलीस करत आहे.