सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : गौराळा ( ता. मारेगाव) येथील खुशाल महादेव येरगुडे यांची ग्रामरोजगार साहाय्य संघटनेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. निवडीचे पत्र त्यांना राज्य अध्यक्ष हनुमंते साहेब यांनी दिले. खुशाल येरगुडे नऊ वर्षे संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. गेली चार वर्षे त्यांनी मारेगाव तालुकाध्यक्ष पदावर काम केले आहे.त्यांनी तालुका प्रशासनाच्या विरोधात ग्रामरोजगारांच्या हक्कासाठी उपोषण केले होते. त्यामुळे अनुभवी व कर्तव्याची जाण असणाऱ्या कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्ष पदावर संधी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांतून समाधान व्यक्त होत असून जिल्ह्यासह मारेगाव तालुक्यातून त्यांचेवर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दिनांक 30/7/2025 रोजी यवतमाळ जिल्हा कार्यकारणी निवडीची मिटिंग शासकीय विश्रामगृह, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली होती. 16 तालुका अध्यक्ष यावेळी हजर होते. जिल्हाअध्यक्ष पदा करिता 3 उमेदवार रिंगणात होते. निकालाअंती मारेगाव तालुका अध्यक्ष खुशाल येरगुडे यांची 16 पैकी 13 एवढे मतदान त्यांच्या बाजूने झाले. यात येरगुडे यांचा दणदणीत विजय झाला आहे.
नवीन कार्यकारिणी खालीलप्रमाणे:
जिल्हाध्यक्ष खुशाल येरगुडे (मारेगाव), उपाध्यक्ष गोपिदास पवार (यवतमाळ), उपाध्यक्ष विलास पवार (राळेगाव), सचिव विजय लोखेडे (आर्णी), कोषाध्यक्ष गुलाब बरसी (उमरखेड), कोषाध्यक्ष लविचंद पवार (पुसद), जिल्हा संघटक विनोद आडे (दारव्हा)