Top News

२८ जुलै ला काँग्रेस चे अर्धनग्न आंदोलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : तालुक्यातील ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने या रस्त्याची बांधकाम विभाग (PWD) दखल घेत नसल्याने तालुका काँग्रेस कमिटी, मारेगाव च्या वतीने येत्या दि. 28 जुलै रोजी रास्ता रोको व अर्धनग्न आंदोलन करण्यात येत आहे.  

बरेच दिवसापासून व अनेकदा आपल्या माध्यमातून पी.डब्ल्यु. डी. (बांधकाम विभाग) ला अनेक निवेदन दिले परंतू निवेदनाला बगल देत मारेगांव तालुक्यामधील कुठल्याही रस्त्याबाबत योग्य दखल घेतली नाही व रस्ते "जैसेच्या तैसे" परिस्थितीमध्ये आहे. मागील कितेक दिवसापासून मारेगांव ते मार्डी रोड मंजुर झाल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात सांगण्यात येत आहे, सदर रस्त्याचे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून उद्घाटन सुद्धा पार पडले. तरी पण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही. 

या उलट रस्ताच्या आजुबाजुची माती खोदून सायडींग भरण्याचे काम केले परंतू कच्या मातीमुळे वाहन फसतात त्यामुळे वाहतुकीसं अडथळा निर्माण होऊन नाहक त्रास सहन करावा लागतात या गोष्टी टाळण्यासाठी या रस्त्याचे पक्के काम सुरु करणे अत्यावश्यक आहे. मात्र, थातूर मातुर काम करून वेळ काढणे सुरु असल्याने संबंधित विभागाच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने जनतेला होणाऱ्या त्रासाला आता पावसाळ्यात तरी पूर्णविराम मिळावा, यासाठी सोमवारी मारेगाव ते भालेवाडी (हनुमान मंदिर (वानरदेव) या ठिकाणी सकाळी 11 वाजता रास्ता रोको व अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार आहे. असं अध्यक्ष मारोती गौरकार यांनी सांगितले. त्यांनी माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे की, या आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हावे..

Previous Post Next Post