Top News

वर्धा जिल्ह्यातील दुचाकी चोरटा वणी पोलिसांच्या जाळ्यात अडकला

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : दिनांक २३/०७/२०२५ रोजी तक्रारदार नामे मारोती अर्जुन भानारकर, वय ६२ वर्षे, रा. भोईपूरा (वणी) यांनी पोलीस स्टेशन वणी येथे तकार नोंदविली की, दिनांक २०/०७/२०२५ रोजी रात्री ०८.४५ वाजता दरम्यान आठवडी बाजार वणी येथे मासे विकी करीत असतांना त्यांनी त्यांचे मालकीची काळ्‌या रंगाची मोटर सायकल स्पेल्डर क्रमांक MH 29 CC 1367 दूकानाचे मागे उभी केली होती. दुकानात मासे विकी करीता गर्दी असल्याने, कोणीतरी अज्ञात चोरट्‌याने संधीचा फायदा घेत त्यांचे मालकीची मोटर सायकल स्पेल्डर कमांक MH 29 CC 1367 किंमत 70.000 रूपये चोरून नेली, सर्वत्र मोटर सायकलचा शोध घेतला कुठेच मिळून न आल्याने कायदेशीर कार्यवाही करीता पो.स्टे. ला तक्रार देत आहे. अशा तक्रारीवरून पो.स्टे. अपराध कमांक ५२५/२०२५ कलम ३०३(२) B.N.S. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याची तकार पो.स्टे. ला प्राप्त होताच, चोरीस गेलेल्या मोटर सायकल स्पेल्डर कमांक MH 29 CC 1367 आणि आरोपीचा शोध घेत असतांना शहरातील सि.सि.टि.व्हि कॅमेरे चेक केले असता, एक संशयित इसम वय अंदाजे २५ वर्षे हा सदर गुन्हयात चोरीस गेलेली मोटर सायकल घेवून जात असतांना दिसून आला, त्यावरून सदर आरोपीचा शोध घेत असता प्राप्त सि.सि.टि.व्हि फुटेज वरून आरोपीची चोरीचे घटनेपूर्वीची फुटेज चेक केले असता आरोपीच्या हालचालीवरून त्याचे संपर्कात आलेले साक्षीदार याना विचारपूस केली असता, संशयित इसमाने त्याचे नाव शेखर सांगून त्याने त्याचे ताब्यातील मोटर सायकल पल्टीना बजाज कमांक MH 35 2 4194 ही पाच हजार रूपयामध्ये गहाण ठेवल्याचे सांगीतले. सदर गुन्हयात तांत्रीक पध्दतीने तपास करीत आरोपीचे नाव चंद्रकांत उर्फ शेखर शंकर कुटारकार, वय २५ वर्षे, रा. गव्हा (कोल्ही) ता. समूद्रपूर, जि. वर्धा असे असल्याचे समजले. आरोपीचा त्याचे राहते गावी गव्हा (कोल्ही) ता. समुद्रपूर, जि. वर्धा येथे शिताफिने ताब्यात घेण्यात आले व त्याचे कडून त्याचे गुन्हयात चोरलेली मोटर सायकल कमांक MH 29 CC 1367 ही जप्त करण्यात आली.

आरोपीस विश्वासात घेवून इतर गुन्हयात चोरी बावत विचारपूस केली असता त्याने वणी येथे साक्षीदार कडे गहाण ठेवलेली मोटर सायकल प्लॅटीना बजाज कमांक MH 35 2.4194 ही बूट्टबोरी जि. नागपूर येथून बोरी केल्याची कबुली दिली. त्याबाबत पो.स्टे. बूट्टबोरी जि. नागपूर येथे संपर्क केला असता त्याठिकाणी सदर मोटरसायकल बाबत अपराध कमांक ६९१/२०२५ कलम ३०३(२) B.N.S. अन्वये गुन्हा नोंद असल्याचे समजले. त्याप्रमाणे आरोपीकडून पो.स्टे. वणी येथे दाखल गुन्हयातून मोटर सायकल स्पेल्डर कमांक MH 29 CC 1367 किमत ७०,०००/- रूपये आणि पो.स्टे बूट्टबोरी जि. नागपूर येथील दाखल गुन्हयातील प्लॅटीना बजाज कमाक MH 35 Z 4194 किमंत ४०,०००/- असा एकूण ११०,०००/- रूपयाचा मूझेमाल जप्त करण्यात आला

सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्र यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर आणि डी.बी पथकातील पो.उप.नि. धिरंज गुल्हाने, मोहम्मद वसीम, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पुष्पलवार, गजानन कुडमेथे सर्व पो.स्टे. वणी यांनी पार पाडली


Previous Post Next Post