सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मुंबई : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता जातपडताळणी, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यांसारख्या सर्व शासकीय प्रतिज्ञापत्रांसाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे.
• घोषणा कोणी केली?
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत 4 जुलै रोजी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
• आता फक्त साधा कागद पुरेसा
यापुढे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची गरज नाही. फक्त स्वसाक्षांकित अर्ज लिहून संबंधित तहसील कार्यालयात सादर करा, आणि तुम्हाला आवश्यक ते प्रमाणपत्र मिळेल.
• कोणाला होणार फायदा?
1. दहावी आणि बारावी नंतर प्रमाणपत्रासाठी धावपळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना
2. अनेक दाखले लागणाऱ्या पालकांना
3.शासकीय योजना, शिष्यवृत्ती, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना
• त्वरित अंमलबजावणी
पूर्वी नव्या सरकारने हे शुल्क 100 वरून 500 रुपये केले होते, मात्र यामुळे सामान्यांना आर्थिक बोजा वाढल्याने निर्णय मागे घेण्यात आला. आता नवीन आदेशाची तात्काळ अंमलबजावणी होणार आहे.
• नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
पालक आणि विद्यार्थी म्हणतात, "आता खर्च वाचणार! साध्या कागदावर अर्ज करून आम्हाला आवश्यक दाखले सहज मिळतील!"
• आता अर्ज करा आणि वाचवा वेळ,पैसा
स्वसाक्षांकित अर्ज तयार करून तहसील कार्यालयात सादर करावा लागणार असून तेव्हा प्रमाणपत्र मिळणार.