Top News

आलिशान ट्रॅकमधून अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनावर शिरपूर पोलिसांची कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : तालुक्यात अवैध रेतीची चोरी ट्रॅक्टर, टिप्पर अशा वाहनाने होतेय, हे काही नवीन नाही. अशा वाहणावर अनेकदा कार्यवाही झालेली वाचण्यात आल्या आहेत. मात्र, आलिशान लांब पल्ल्याचा ट्रक मधून चक्क अवैध रेती वाहतूक करताना शिरपूर पोलिसांनी चारगाव ते पुनवट रोडवर ताडपत्री झकलेले दोन ट्रक जप्त करून हे दोन्ही आलिशान ट्रक शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये जमा करण्यात आले आहे. पुढील कारवाईबाबत पत्र वणी तहसील कार्यालयात देण्यात आले.

शिरपूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार माधव शिंदे हे शुक्रवारी 6 जुन रोजी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती मिळाली की, चारगांव ते पुनवट रोडवर आलिशान ट्रक मधून अवैध्यरित्या रेती वाहतुक होत आहे. अशी माहिती मिळताच ठाणेदार शिंदे यांनी क्षणाचा विलंब न करता तत्काळ आपल्या पोलिस ताफ्या सह शेलु (बु) येथे नाकाबंदी केली. काही वेळातच चारगांव ते पुनवट रोडने दोन ट्रक येताना दिसताच येणा-या संशयित तपकिरी रंगाच्या अशोक लेलॅन्ड कंपनीचे दोन्ही वाहन थांबवुन सदर दोन्ही ट्रकची तपासणी केली. तेव्हा त्यांना सदर ट्रकमध्ये लाल रंगाची रेती दिसली, सदर रेती बाबत परवाना बाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सदर दोन्ही ट्रकमध्ये अवैद्यरित्या लाल रेती वाहतुक करीत आहेत, अशी खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन नमुद वाहनातील इसमांना त्यांचे नाव व गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सैय्यद शहाबुद्दीन सैय्यद अफसर (वय 33 वर्ष) रा. पुसद (खादी वॉर्ड) जि. यवतमाळ व शेख हसन इमाम शेख उवेदुर रझाक (वय 51 वर्ष) जि. यवतमाळ असे त्यांनी सांगितले व सदर अवैध्य रेती ही ट्रक मालक  उमर फारुख (चय अं.45 वर्षे) रा. पुसद, यवतमाळ यांचे सांगणेवरुन वाहतुक करीत असल्याचे सांगितल्याने वरील इसमांविरुध्द दोन्ही ट्रक क्रमांक (MH 29, BE-6296 व MH -29, BE- 6296) अंदाजे किंमत 50 लाख व त्यामध्ये एकुण 24 ब्रास रेती 1 लाख 92 हजार रुपये ची लाल रंगाची रेती असा एकुण 51 लाख 92 हजार रुपये चा मुद्देमाल सहीत दोन्ही ट्रक ताब्यात घेउन पुढील कारवाईसाठी शिरपूर पोस्टे च्या आवारात जमा करण्यात आले असून दोन्ही ट्रक वाहनचालकांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच अवैध्यरित्या रेती बाबत पुढील कारवाईसाठी अहवाल तहसिल कार्यालय वणी येथे पाठविण्यात येणार आहे.

सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किन्द्रे, पोलीस निरीक्षक सतीश चवरे सा. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर, पोउपनि रावसाहेब बुधवंत, प्रशांत झोड, पंकज कुळमेथे यांनी पार पाडली.
Previous Post Next Post