Top News

डॉ.प्रिया झाडे यांचे आकस्मित निधन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : चिखलगाव येथील महादेव नगरिमध्ये वास्तव्यास असणाऱ्या डॉ. चंद्रकांत झाडे यांच्या पत्नी सौ. डॉ. प्रिया चंद्रकांत झाडे (35) यांचा काल रात्री 10:00 वाजताच्या सुमारास आकस्मित निधन झाले. 

गेल्या अनेक वर्षांपासून वणी शहरात आपली वैद्यकीय सेवा देणाऱ्या प्रिया झाडे यांच्या आकस्मित निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

डॉ. प्रिया यांच्या पश्चात पती चंद्रकांत झाडे, मुलगी नायरा, सासू मोठी बहीण, असा बराच मोठा परिवार आहे.

आज मंगळवारी सकाळी 11 वाजता चिखलगाव येथील मोक्षधाम येथे त्यांचे पार्थिवावर अंत्यविधी होणार आहे. 


Previous Post Next Post