जी.आर.एन.कंपनीने दिलेला शब्द फिरवल्याने भाकपने आज पुन्हा उपसले आंदोलनाचे हत्यार

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : जी.आर.एन.कंपनीत बेलोरा(निलजई)परिसरातील स्थानिक बेरोजगारांना प्राधान्यक्रमाने सामावुन घेण्यासाठी मागे 25 ते 27 एप्रिल 2025 ला भारतीय‌ कम्युनिस्ट पक्षाचे नेत्रुत्वात कंपनीसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. 

आंदोलनाची दखल घेऊन क्षेत्रीय महाव्यवस्थापक, सबेरीया मॅनेजर,कंपनी प्रतीनिधी व भाकप प्रतिनीधींच्या बैठकीत कंपनीने परिसरातील 35 बेरोजगारांना काम देण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले होते.आता कंपनीने  आपला शब्द फिरवत फक्त ड्रायव्हर बेरोजगारांनाच घेऊ असे सांगत आहेत इतर लेबरचे काम स्थानिकांना देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.

भाकपचे असे म्हणणे आहे की, कंपनीने प्राधान्यक्रमाने स्थानिक युवकांना कामे द्यावीत तसा शब्दही कंपनीने दिला होता. ठरलेल्या तारखेपर्यंत आमची मागणी पुर्ण न झाल्याने भाकपने पुन्हा आजपासुन कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे.
भाकपचे वणी विधानसभा नेते काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे,शिंदोला जि.प.सर्कलचे नेते काॅ.मोरेश्वर कुंटलवार,काॅ.मिलींद रामटेके यांचे नेत्रुत्वात शेकडो युवक आंदोलनात सहभागी झालेत.काॅ.अनिल हेपट यांनी इशारा दिला की कंपनीने तत्काळ आमची मागणी पुर्ण करावी, अन्यथा आंदोलन भाकप स्टाईलने उग्र केल्या जाईल.
जी.आर.एन.कंपनीने दिलेला शब्द फिरवल्याने भाकपने आज पुन्हा उपसले आंदोलनाचे हत्यार जी.आर.एन.कंपनीने दिलेला शब्द फिरवल्याने भाकपने आज पुन्हा उपसले आंदोलनाचे हत्यार Reviewed by सह्याद्री चौफेर on May 10, 2025 Rating: 5
Powered by Blogger.