सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या विजेच्या गडगडाटासह वादळ वाऱ्यात बकऱ्या परत घेऊन येत असलेल्या वरुड येथील भारत तुकाराम गेडाम यांच्या जवळ असलेल्या बकऱ्याच्या कळपावर 5.30 वाजता वीज पडली असता यात भारत गेडाम यांच्या वीस बकऱ्या, व दोन बोकड जागीच ठार झाले असून बकऱ्या चारणारे गेडाम हे सुद्धा जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
मारेगाव तालुक्यातील वरुड (नेत) येथील शेतकरी भारत तुकाराम गेडाम हे गावालगत असलेल्या शेत शिवारात बकऱ्या चारण्यास गेले होते. जवळपास तीन वाजताच्या सुमारास वातावरण अचानक बदलले आणि वादळी वारा व विजेचा गडगडाटाला सुरूवात झाली. त्यामुळे ते आपल्या बकऱ्या घेऊन परत गावाच्या दिशेने निघाले, मात्र जोरदार वादळ आणि विजेचा आवाज होत असल्यामुळे ते एका पळसाच्या झाडा खाली उभे ठाकले होते आणि बकऱ्या सुद्धा सोबत होत्या, काही वेळातच बकऱ्याच्या अंगावर विज कोसळली. वीज कोसळल्यामुळे भारत गेडाम ह्यांच्या 22 बकऱ्या जागीच ठार झाल्या. यात शेळी चारणारा भारत गेडाम देखील विजेचा फटका बसल्याने ते सुद्धा जखमी झाले, यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचा उदरनिर्वाह त्यावर असल्यामुळे त्यांना शासन प्रशासनाने मदत करावी अशी अपेक्षा आहे.
वीज पडून बावीस बकऱ्या ठार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 18, 2025
Rating: