जळका येथील 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आजारपणात वेदना असाह्य झालेल्या वेगाव येथील तरुणाने आपले जीवन संपवले. ही घटना ताजी असतानाच तालुक्यातीलच आणखीन एका जीवनात उच्च ध्येय गाठू पाहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विवंचनेत अडकलेल्या दोन तरुणांनी आत्महत्या केल्याचे शनिवारी व रविवारी समोर आले. या दोन्ही घटना २४ तासांतील आहेत.
मारेगाव तालुक्यातील जळका पोड येथील प्रीतम हुसेन आत्राम (२३) यांनी रविवार बाहेरून जाऊन येतोय असे सांगून झाडाला गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले अद्याप तरी अष्पष्ट असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. प्रितमच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. 
दुसरी घटना तालुक्यातील वेगाव येथे घडली. आजाराने त्रस्त असल्याने येथील 25 वर्षीय तरुण दीपक भास्कर रामटेके यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सदर दोन्हीही घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
जळका येथील 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या जळका येथील 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on May 19, 2025 Rating: 5
Powered by Blogger.