महाराष्ट्र दिनानिमित्त मनसेकडून गरजूंना इलेक्ट्रिक पंखे वाटप

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणी : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून परसोडा येथील श्री. बाजीराव महाराज वृद्धाश्रम व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढत्या तापमानापासून बचाव व्हावाथंड वातावरण मिळावे यासाठी इलेक्ट्रिक पंखे वाटप करण्यात आले.

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष मोठ्या प्रमाणात करा असा आदेश राज ठाकरेंनी दिल्यानंतर वणीत मनसेकडून ३० एप्रिलच्या रात्री फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात आली. तर काल ( १ मे) ला सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून परसोडा येथील वृद्धाश्रमात वृद्धांना व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना महाराष्ट्र दिनानिमित्त इलेक्ट्रिक पंखे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली. सध्या उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. तर अवेळी वीजेच्या लपंडावामुळे नागरिकांना गरमीशी सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनसे वणी विधानसभे तर्फे वृद्धाश्रमात व रुग्णालयात जाऊन पंख्यांचे वाटप केले. सदर पंख्यात चार्जिंगची व्यवस्था असून यामध्ये दिवा सुद्धा उपलब्ध आहे. 
यावेळी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष अंकुश बोढे, मयूर गेडाम, मयूर घाटोळे, विलास चोखारे, विजय चोखारे, शंकर पिंपळकर, अमोल मसेवार, गोविंदराव थेरे, बंडु येसेकर, दिलीप मस्के,मयूर मेहता, मनोज नवघरे, हिरा गोहोकार, जुबेर खान, यांच्या सह अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मानले जेष्ठ नागरिकांनी आभार..
"मनसेने दिलेल्या पंख्यांमुळे आम्हाला खूप मदत झाली आहे. उन्हाळ्यात पंख्यांशिवाय राहणे खूप कठीण होते. मनसेचे आम्ही आभारी आहोत,"
महाराष्ट्र दिनानिमित्त मनसेकडून गरजूंना इलेक्ट्रिक पंखे वाटप महाराष्ट्र दिनानिमित्त मनसेकडून गरजूंना इलेक्ट्रिक पंखे वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on May 02, 2025 Rating: 5
Powered by Blogger.