सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : येथील भुमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा वाचुन शिवसेना (उबाठा) स्टाईलने जवाब मागितला असुन या अभिनव प्रकाराने कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण पसरले होते.
बहुचर्चित असलेल्या मारेगाव भुमीअभिलेख कार्यालयात नागरिकांना विहीत मुदतीत सेवा मिळत नसल्याने कार्यालयाचे विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्याच्या तक्रारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडे नागरिकांनी केल्या होत्या, त्याची दखल घेत शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कार्यालयाला भेट दिली होती. भुमीअभिलेख कार्यालयाचे अधिक्षक जाधव यांना शिवसेना स्टाईलने जवाब मागितला होता.मात्र, समाधानकारक उत्तरे मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्यामुळे शिवसैनिकांनी जाधव यांची चांगलीच कान उघडणी केली होती. जमीनीची मोजणी,यासह ईतर कामे वेळेवर होत नसल्याचा मुद्दा शिवसैनिकांनी मांडला होता. मात्र, प्रश्नाचे समाधान कारक उत्तर न देता जाधव यांनी वाद करण्याचा प्रयत्न केला. अपमानजनक शब्दप्रयोग होत असल्याचे पाहुन शिवसैनिक चांगलेच भडकले होते. तहसीलदार उत्तम निलावाड यांनी मध्यस्थी करुन पेटलेले वातावरण अखेर थंड करण्यात यश मिळविले आहे. प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढून नागरिकांना नियमीत सेवा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सुधीर थेटे, शिवसेनेचे पुरुषोत्तम बुटे, राजु मोरे, सुभाष बदकी, देवा बोबडे, अनंता निब्रड, सोमेश्वर गेडेकर, संजय लांबट, प्रणय उईके, दिवाकर सातपुते, यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
भुमीअभिलेख कार्यालयात शिवसैनिकांनी वाचला समस्याचा पाढा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 02, 2025
Rating: