सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी तहसीलदार सातत्याने वाळू तस्करांच्या धडाकेबाज कारवाईचा रेशो कायम ठेवत 15 एप्रिल ला अवैध वाहतूक करणारा हायवा ट्रक वाळू भरून जात असतांना वणी महसूल पथकाने जप्तीची कारवाई केली.
तालुक्यातील वर्धा नदी वाळू घाटातून विना परवाना वाळूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. वणी तहसीलदार यांनी ऍक्शन मोड वर चा रेशो कायम ठेवत आजतागायत अनेक वाळू चोरट्या तस्करांचे कंबरडे मोडण्याचा धडाका लावला आहे.
तस्कर हे दंड व कारवाईला न जुमानता वाळूची तस्करी प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लोकेशन घेत मध्यरात्रीचा डाव साधत आहे. मात्र,तस्करांच्या चोरट्या वाहतुकीला वणी महसूल विभाग करड्या नजरेने बघत हमखास लगाम लावत कारवाईचा बडगा उगारत आहे. आजवर लाखो रुपयांची चोरटी वाळू पकडण्यात नियोजन पद्धतीने तहसीलदार धुळधर यांना यश आल्याचे दिसून येत आहे. तहसील प्रांगणात वाळू तस्करांचे विविध वाहने जप्तीत असून यातून मोठ्या प्रमाणात दंड शासनाला प्राप्त होणार आहे.
कारवाईचे सातत्य असतांना वाळू तस्करांच्या मुजोऱ्या मात्र, जप्ती अन दंडास पात्र ठरत आहे. तहसीलदार यांच्या सुनियोजित नियोजनाचा ट्रॅक्टर धारकांनी तालुक्यात कमालीचा धसका घेतला आहे तर हायवा ट्रक धारक यांच्या मुजोऱ्या अंगलट येत आहे. यामुळे आता ते चांगलेच बुचकाळ्यात पडले आहे.
दरम्यान, ही 15 एप्रिल रोजी अवैध वाहतूक करणारा हायवा क्र. (एम एच 40, वाय 8991) या ट्रक वाहनावर कारवाई तहसीलदार निखिल धुरधर, यांनी पार पाडली. यापुढे हे अधिकारी घाट पालथे घालत व कारवाईसाठी वणी अधिकारी व प्रशासन वणी पथकाच्या दिमतीला असणार असल्याने वाळू तस्करांना हा पुन्हा गर्भीत इशारा आर्थिक कंबरडे मोडण्यास पुरेसा ठरणार आहे एवढे मात्र निश्चित.
वाळू तस्करीला चाप..."हायवा" जप्त.. महसूल विभागाचा कारवाईचा रेशो कायम
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 18, 2025
Rating: