सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिखलगाव येथे एका इसमाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
संभा बापुराव निकोडे (55) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. आज दि.18 एप्रिल ला सकाळी घरी कोणीच नसल्याने त्यांनी आपली ईहलोकाची यात्रा केली. सदर घटनेची माहिती वणी पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय वणी येथे पाठविण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
वणी तालुक्यात आत्महत्याची धग...
दुसरी आत्महत्येची घटना तालुक्यातील शिरपुर पोलीस स्टेशन हद्दीतील पुरड (पुनवट) येथील एका तरुणीने मृत्यू ला कवटाळल्याची घटना उघडकीस आली आहे.पायल बालाजी उरकुटे (25),असे मृतक तरुणीचे नाव आहे. शुक्रवार दिनांक १८ एप्रिल ला दुपारच्या सुमारास पायल चे आईवडील शेतात गेले असता तिने घराच्या आडोश्याला दुपट्टा बांधून आपल्या जीवनाचा दी एन्ड केला.हि बाब घरच्या मंडळींना कळल्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. सदर बाब शिरपूर पोलिस स्टेशन ला कळविण्यात आली.घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेत पायल चा मॄतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मात्र, मृतक पायल हिने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.
वणी तालुक्यात सतत आत्महत्येच्या घटनेत वाढ झाली असून संपूर्ण तालुका प्रभावित होताना दिसत आहे. दिवसेंदिवस आत्महत्यासारख्या घटना घडत असताना याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालून जनजागृती अभियान राबविण्याची गरज आहे.
आत्महत्येची धग...एकाच दिवशी वणी तालुक्यात दोन वेगवेगळ्या आत्महत्या
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 18, 2025
Rating: