अल्पवयीन बहिणी च्या लग्नाचे छायाचित्र मावस भावाच्या मोबाईल वर

सह्याद्री चौफेर| ऑनलाईन

 मारेगाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन लग्न केल्याची घटना मारेगाव शहरात घडली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे मुलीच्या भावाने पोलिसात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.       
29 मार्च ला सकाळी भाऊ उठल्यावर बहीण घरी दिसून आली नाही. म्हणून भावाने तिची घरी तसेच सभोवताल सगळीकडे चौकशी केली असता ती कुठेही दिसून आली नाही. तसेच नातेवाईकांना बहिणीबद्दल संपर्क साधून विचारले असता ती नातेवाईकांकडे सुद्धा मिळून आली नाही. 
बहिण कोठेच आढळून न आल्याने शेवटी भावाने मावशीच्या मुलाला फोन केला असता मावस भावाने सांगितले की ती माझ्याकडे नाही परंतु तिच्या लग्नाचे फोटो मात्र माझ्या मोबाईलवर कोणीतरी पाठवलेले आहे. मुलीचे फोटो बघताच मुलीच्या भावाच्या लक्षात आले की हा आपला चुलत मेहुना कृष्णा हनुमंतू कोशट्टीवार (वय अंदाजे 22 वर्ष), राहणार मांडवी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड हा असून यानेच आपल्या बहिणीला फूस पळवून नेले आहे,असे त्याच्या लक्षात आले.
बहिण अल्पवयीन 17 वर्षे 6 महिन्याची असल्यामुळे तिला पळवून नेणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा,अशा प्रकारची तक्रार भावाने मारेगाव पोलीस ठाण्यात केलेली आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे
अल्पवयीन बहिणी च्या लग्नाचे छायाचित्र मावस भावाच्या मोबाईल वर अल्पवयीन बहिणी च्या लग्नाचे छायाचित्र मावस भावाच्या मोबाईल वर Reviewed by सह्याद्री चौफेर on April 01, 2025 Rating: 5
Powered by Blogger.