दोघींना फूस लावून पळविले,नातेवाईकांचे मारेगाव पोलिसात तक्रार

संग्रहीत छायाचित्र

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : "माझं बाळ" म्हणणाऱ्या आई वडिलांना सोडून मुलं रफू चक्कर होतांनाचे चित्र सर्वत्र असतांना मारेगाव तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना नातेवाईकांनी फूस लावून पळवून नेल्याची पोलिसात तक्रार दाखल केल्याने 'त्या' दोघी नेमक्या कुठं आणि कुणासोबत आहे याबाबत पोलीस प्रशासन कसून चौकशी करीत आहे.

मारेगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन मुली एक भल्या पहाटे तर, दुसरी प्रांतःविधीला जाण्याच्या बहाण्याने बेपत्ता झाल्या. गंणगोतांनी सर्वत्र नातेवाईकांकडे तपास केला. मात्र, त्या मुलींचा शोध लागला नाही. हतबल झालेल्या आईवडिलांना व नातेवाईकांनी पोलिसात धाव घेत फूस लावून पळवून नेल्याची पोलिसात तक्रार दाखल केली.

परिणामी, या शालेय विद्यार्थिनी नेमक्या कुठं गेल्या असतील याचा शोध सुरु असतांना या सामाजिक दृठ्या संवेदनशील घटनेला नेमकी कशाची किनार आहे.हे त्या मुलींचा शोध लागल्या नंतरच स्पष्ट होईल. तूर्तास या गंभीर घटनेने नातेवाईकांत चिंतेचे सावट आहे.
दोघींना फूस लावून पळविले,नातेवाईकांचे मारेगाव पोलिसात तक्रार दोघींना फूस लावून पळविले,नातेवाईकांचे मारेगाव पोलिसात तक्रार Reviewed by सह्याद्री चौफेर on April 26, 2025 Rating: 5
Powered by Blogger.