सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : वणी उपविभागीय क्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर कारवाईचा बळगा उगारल्याचे दिसून येत आहे. अशातच काल सकाळी वणीचे नायब तहसीलदार ब्राम्हवाडे यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले.
यावेळी ट्रॅक्टर मध्ये अंदाजे एक ब्रास अवैध वाळू मिळून आली. यावेळी कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून ट्रॅक्टर वणी तहसील कार्यालयात जमा केला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. या कारवाईमुळे वाळूची तस्करी करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. वणीचे नायब तहसीलदार अशोक ब्राम्हवाडे यांच्यासह तलाठी विरुटकर उमरी फाट्यावर 8 एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजेच्या सुमारास पाळत ठेवून होते.
यावेळी त्यांना अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणारे विना क्रमांकाचा ट्रॅक्ट्रर ट्रॉली मधून अंदाजे एक ब्रास अवैध वाळूची वाहतूक करतांना आढळले. त्यानंतर कायर मार्गे उमरी कडे येणाऱ्या ट्रॅक्टर सह ट्रॉली ची महसूल पथकाने विचारपूस केली, मात्र समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही कारवाई केली आहे. वणी तालुक्यातील नदी-नाल्याच्या पात्रातून वाळूचे उत्खनन करुन व महसूल पथकावर वाळू तस्कर पाळत ठेऊन त्यांचे लोकेशन घेत अवैध वाळूची वाहतुक करत आहेत.
तहसीलदार निखील धुळधर यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करण्यात आले हे पथक गस्त घालत असताना उपरोक्त ट्रॅक्टर मधून अवैध वाळूची वाहतुक करताना उमरी येथे कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, तलाठी विरुटकर, यांनी केली आहेे.