सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : येथील आगाराला लालपरी नविन बसेस देण्यात याव्या अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे राज्याध्यक्ष राजु धावंजेवार यांच्या नेतृत्वात दिनांक 15 मार्च ला वणी आगारप्रमुख यांच्या मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
वणी आगाराकडे एकूण 65 बसेस होत्या परंतु त्यापैकी 33 बसेस कालबाडा झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. महिलांना अर्धे तिकीट असल्यामुळे एस.टी. मध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे महामंडळाला नफा होत आहे. 32 बसेसवर वणी आगाराची डोलारा उभा आहे. 7 ते 8 बसेस विद्यार्थ्यांना प्रवासाकरीता लागतात. त्यामूळे वणी आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस सुद्धा बरेच दिवसापासून बंद आहे. नुकत्याच यवतमाळ जिल्ह्यात नविन लालपरी बसेस आल्या त्यामध्ये यवतमाळ, उमरखेड, पुसद, पांढरकवडा, दिग्रस, दारव्हा तसेच राळेगांव या आगाराला नवीन बसेस मिळाल्या परंतु वणी आगाराला एकही नविन बस मिळाली नाही. वणी आगाराचे उत्पन्न हे जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. परंतु प्रवाशांना बसेस उपलब्ध नसल्यामुळे नाहक त्रास होत आहे. तरी आम्ही मानवी हक्क परिषदेच्या वतीने आपणाकडे नम्र निवेदन सादर करतो की येत्या 15 दिवसात वणी आगाराला नविन बसेस देण्यात याव्या अन्यथा मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमु परशुराम पोटे, विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष विकेश पानघाटे वणी विधानसभा भाऊसाहेब आसुटकर, वणी शहर अध्यक्ष अजय चन्ने, यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत हनुमते, सौ. सुमित्रा गोडे वणी तालुका महिला अध्यक्ष, सौ. सुनीता काळे वणी शहर महिला अध्यक्षा सौ. प्रमिला चौधरी व सुरेश बन्सोड महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, वामनराव कुचनकार प्रदेश कार्यकारी सदस्य, संदिप बेसरकर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य, अमोल कुमरे, मारेगांव तालुका अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा महिला उपाध्यक्षा सौ. मनिषा सु. निब्रड तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
वणी आगाराला नवीन लालपरी बसेस त्वरीत द्या - मानवी हक्क सुरक्षा परिषद (ट्रस्ट) ची मागणी
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 15, 2025
Rating: