सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : काश्मीर मधील पहलगाममध्ये झालेल्या आंतकवादी हल्ल्याचा मानवी हक सुरक्षा परिषदेच्या वतीने गुरुवारी सायंकाळी सहा वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध नोंदविला यावेळी पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरीकांच्या आत्म्याला शांती लाभो याकरिता मेनबत्ती लाउन श्रध्दांजली वाहिली.
२८ पर्यटकांचा जागीच मृत्यु झाला. समामन सुन्न करणाऱ्या या घटनेचा मानवी हक्क सुरक्षा परिषदेने तिव्र स्वरुपात निशेध व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.विजय नगराळे होते तर कार्यक्रमाचे संचालन वामनराव कुचनकार यांनी केले.
यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख, परशुराम पोटे, ज्ञानेश्वर बोनगीनवार, वामनराव कुचनकार, डॉ विजय नगराळे, अमोल कुमरे, श्रीकांत हनुमंते, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सौ सुमित्राताई गोडे, सौ. प्रेमिला चौधरी, सौ सुनिता काळे, पुष्पाताई कुळसंगे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
मानवी हक्क सुरक्षा परिषदेने केला पहलगाम घटनेचा निषेध
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 25, 2025
Rating: